Hydroponics technology

Hydroponics technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…

तंत्रज्ञान

Hydroponics technology । शेतकरी हल्ली शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वळू लागले आहेत. ज्याचा त्यांना फायदा होत आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती (Farming with technology) करत आहेत.

Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत पिकवला गांजा

पण एका शेतकऱ्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने चक्क गांजा पिकवला आहे. भारतात खरंतर गांजा (Cannabis cultivation) शेतीला अनेक वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी गांजा शेती करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येते. तरीही अनेक शेतकरी गांजा शेती करतात. अशाच एका शेतकऱ्याने हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा (Hydroponics) आधार घेत गांजा पिकवला आहे.

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

घरातच हायड्रोपोनिक गांजाची शेती करणाऱ्या एका व्यक्तीला एनसीबीने बेड्या ठोकल्या होत्या. डोंबिवलीच्या पलावा सिटीमधील रहिवासी इमारतीतील २ बीएचके फ्लॅटमध्ये शेती सुरू होती. यासाठी डार्कवेबद्वारे अॅमस्टरडॅम, नेदरलँण्ड येथून बियाणे विकत घेतले होते. एनसीबीने अटक केलेल्या दुकलीकडून १ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.

Government Schemes । शेतकऱ्यांनो, ड्रीपसाठी तुम्हीही करू शकता अर्ज? ‘हे’ कागदपत्रे लागतात; जाणून घ्या किती मिळेल अनुदान?

दरम्यान, मागील ११ महिन्यांत मुंबई पोलिसांकडून तब्बल ६२९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ७७५ गुन्हे नोंदवत ८३४ आरोपींना अटक केली आहे. जर तुम्हीही शेतीच्या नावाखाली गांजा शेती केली तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्हाला कोठडीची हवा खावी लागणार आहे. कारण गांजा शेतीला बंदी घालण्यात आली आहे.

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार जास्त भरपाई

किती मिळत आहे भाव?

किमतीचा विचार केला तर सध्या बाजारात ५० ते १०० रुपयांमध्ये गांजाचे पॅकेट मिळत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे झोपडपट्टीसह हायप्रोफाइल सोसायटीसह शाळा, कॉलेज परिसराभोवती तस्कर मंडळी घिरट्या घालत असताना अनेकवेळा पोलिसांच्या कारवाईत सापडले आहेत.

Dog Race। ऐकावं ते नवलच! शेतकऱ्याला कुत्रीने जिंकून दिल्या ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *