Farmers Interest Waive : शेतकऱ्यांना सतत विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी निसर्गाचा लहरीपणा (Heavy rain) तर कधी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. साहजिकच शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतात. यावर्षी देखील अशीच समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले आहेत. काही शेतकरी कर्ज (Loan) न फेडता आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते.
शेतकरी यंदाही कर्जमाफी (Loan waiver) देण्याची मागणी करत होते. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून 2015-16 यावर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण यासाठी काही अटी आहेत. (Interest Waive)
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत फुलवली खरबुज शेती, आज होतेय लाखात कमाई
सरकारच्या या निर्णयानुसार 2015-16 या वर्षातील संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षांचे सहा टक्के दराने असणारे सर्व व्याज राज्य सरकारकडून भरले जाईल, कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याबाबत शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
Tur Market Price । कधी वाढणार तुरीचे भाव, जाणून घ्या अभ्यासकांचे मत
कोणत्या जिल्ह्याला होणार फायदा
दरम्यान, 2015 यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या कालावधीत राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. याची सर्वात मोठी झळ रत्नागिरी जिल्ह्याला बसली होती. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याची मागणी सप्टेंबर 2023 मध्ये राज्य सरकारकडे केली होती. आता त्यानुसार 2014-15 या वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचे 2015-16 या वर्षातील संपूर्ण व्याज माफ केले जाईल.
Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?
कोणाला मिळणार नाही लाभ
तसेच पुढील चार वर्षाचे 6 टक्के दराने व्याज राज्य सरकार भरणार आहे. याचा रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 11 हजार 783 शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल ज्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण