Government Schemes । सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना (Govt Schemes) सुरु करत असते. ज्याचा देशातील करोडो लोक फायदा घेत आहेत. परंतु, अजूनही असे काही नागरिक आहेत ज्यांना या सरकारी योजनांबद्दल माहिती नाही. भूमिहीन शेतमजुरांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकारकडून एक योजना (Agri Schemes) राबवली जात आहे. या योजनेद्वारे जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
Foreign tour of farmers । मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला दीड कोटींचा निधी
दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
अनेकांची आर्थिक स्थिती चांगली नसते. अशावेळी त्यांना स्वतःची शेतजमीन विकत घेता येत नाही. त्यामुळे अशी कुटुंबे पिढ्यानपिढ्या दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात. हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने योजना सुरू केली आहे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना (Dadasaheb Gaikwad Empowerment Scheme) असे या योजनेचे नाव आहे. भूमिहीन शेतकऱ्यांना सन्मान मिळावा, त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
सरकारकडून नवबौद्ध, दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना, अनुसूचित जाती, जमाती, परितक्त्या किंवा विधवा महिला तसेच भूमिहीन व्यक्ती यांची आर्थिक उन्नती आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. भूमिहीन कुटुंबांना 4 एकर जिरायती (कोरडी) जमीन किवा 2 एकर बागायती (सिंचित) जमीन 100 टक्के अनुदान तत्वावर दिली जाते.
Milk business । महाराष्ट्रातील ‘हे’ अख्ख गाव करतंय दूध व्यवसाय, होतेय लाखोंची कमाई
योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इतर तत्सम कागदपत्रे गरजेचे असतात. जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या ५० रक्कम बिनव्याजी कर्ज आणि उरलेली 50 टक्के अनुदान म्हणून देण्यात येते. सरकारी निर्णयानुसार जिरायती व बागायती जमिनीची किमत कमाल 3 लाख रुपये प्रति एकर मयदिपर्यंत निश्चित केली होती.
या ठिकाणी करा अर्ज
सामाजिक न्याय विभागाकडून ही योजना राबवण्यात येते, जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नाशिकमधील नासरडी पुलाजवळील सामाजिक न्याय भवन येथे योजनेची माहिती मिळेल. किंवा तुम्ही https://sjsa. maharashtra. gov.in/ या वेबसाइटवर अर्ज करू शकता.
Wheat crops । गव्हाच्या पिकामध्ये गुळासोबत करा ‘हा’ अनोखा प्रयोग, उत्पन्नात होईल वाढ