Onion Rate । केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यात बंदी (Onion export ban) करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यात बंदी केल्यापासून कांद्याचे दर घसरत (Onion rate falls down) चालले आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. येत्या काळातही हे दर (Onion price) आणखी कमी होऊ शकतात. त्यामुळे शेतकरीवर्ग निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत.
Bhandara News । धक्कादायक बातमी! शेतात तीन महिलांवर मधमाशांचा भयानक हल्ला, तिघीही गंभीर जखमी
खर्चासाठी खिशातून घातले ५६५ रुपये
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील मिळणे अवघड झाले आहे. नुकताच बीड (Beed) जिल्ह्यातील नेकनूर या गावातील एका शेतकऱ्याने साडे चार क्विंटल कांदा सोलापूर बाजार समितीत नेला होता. परंतु, या शेतकऱ्याला स्वतःच्याच खिशातून 565 रुपये द्यावे लागले. आता या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. (Solapur Market Committee Onion Rate)
वैभव शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात साडे चार क्विंटल कांदा सोलापूर बाजार समितीत (Solapur Market Committee) विक्रीला नेला होता. यात त्यांचा एकूण 345 किलो गोल्टी कांदा आणि 98 किलो हा मोठा कांदा होता. परंतु, गोल्टी कांदा हा बाजार समितीने मागणी नाही असे म्हणत त्याची खरेदी करणे टाळले. तसेच मोठा कांदा हा एक रुपये प्रति किलो दराने खरेदी केला.
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
अशाप्रकारे त्यांना बाजार समितीत आणलेल्या एकूण कांद्याला फक्त 98 रुपये मिळाले , तसेच गोल्टी कांदा बाजार समितीत बाजारभावाविना सोडून द्यावा लागला. 443 किलो कांद्यासाठी गाडी भाडे आणि सर्व बाजार समिती तोलाई-वाराई खर्च मिळून 663 रुपयांचा खर्च आला. त्यापैकी 98 रुपये कांद्याचे झालेले पैसे वजा जाऊन वैभव शिंदे यांना स्वतःच्या खिशातून 565 रुपये देऊन गाडी भाडे आणि इतर खर्चासाठी व्यापाऱ्याला द्यावे लागले.
Agriculture Land । शेत जमीन विकल्यास कर भरावा लागतो का? कायदा काय सांगतो जाणून घ्या
दरम्यान, शेतकरी वैभव शिंदे यांना 7 एकर जमीन आहे. यापैकी शिंदे यांनी दोन एकरमध्ये कांदा लागवड केली होती. कांदा लागवडीसाठी 70 हजार रुपये खर्च आला. यंदा कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने शिंदे यांनी कांद्याची लागवड केली. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. सोलापूर बाजार समितीत त्यांनी विक्रीला आणलेला कांदा अवघा एक रुपया प्रति किलो दराने विकला गेला.
धक्कादायक बाब म्हणजे गोल्टी कांद्याची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्याच्या पदरी काहीच आपले नाही. याउलट त्यांना स्वतःच्या खिशातून 565 रुपये द्यावे लागले. वैभव शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी टोमॅटो लागवड केली होती, त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला होता. तसेच त्यांना कांद्यातून देखील चांगला नफा मिळाला होता. त्यामुळे त्यांनी यंदा कांद्याची लागवड केली. परंतु त्यांना आता तोटा सहन करावा लागला आहे.