Farming on Solar

Farming on Solar । काय सांगता! ‘हे’ संपूर्ण गाव करतंय ‘सोलार’वर शेती

बातम्या

Farming on Solar । शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. तशीच शेतीसाठी वीजदेखील (Light) खूप महत्त्वाची आहे. जर शेतात वीज उपलब्ध नसेल तर पिकांना पाणी देता येत नाही. अनेकदा पाणी असूनही पिके जळून जातात, याचे कारण म्हणजे वीज. शेतकऱ्यांना सतत विजेच्या संकटाचा (Power crisis) सामना करावा लागतो. परंतु, राज्यात असे एक गाव आहे ते चक्क ‘सोलार’वर शेती करते. ‘सोलार’वर शेती (Solar Farming) करत असल्याने त्यांना विजेचा खर्च (Electricity costs) येत नाही.

Dairy Business Scheme । ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन करा दुग्धव्यवसाय, व्याजाशिवाय मिळेल कर्जाचा लाभ

‘सोलार’वर शेती

विजेचा तुटवडा झाल्यानंतर भारनियमन करण्यात आले आहे. आता नव्याने शेतीला कनेक्शन मिळणे अवघड बनले आहे. तर पुरेशा दाबाने ८ तास वीज देखील मिळणे कठीण झाले आहे. अशातच आता माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असणाऱ्या बेंबळे(Bembale) गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत आहे. या गावात पुरेशा दाबाने वीज मिळेना मिळत नाही.

Onion Export Ban । कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका! दरात झाली 50 टक्क्यांची घसरण, पाहा किती मिळतोय दर?

अशी झाली सुरुवात

त्यामुळे या गावात शेतीसाठी सोलार पंप बसविण्याची कल्पना पुढे आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सोलार पंप बसविण्यासाठी जयवंत भोसले यांनी पुढाकार घेतला. परंतु, सुरुवातीला या गावातील शेतकऱ्यांचा सोलारवर मोटारी चालतील यावर विश्वास नव्हता. त्यामुळे जयवंत भोसले हे सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटले.

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांनो, त्वरा करा; ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळतंय अनुदान, सोप्या प्रकारे करा अर्ज

त्यानंतर भोसले यांनी बेंबळे गावचे सिंचन क्षेत्र व वीज पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेतली. पुढे त्यांनी या गावात १०० सोलार पंप बसविण्यास परवानगी दिली. असे असले तरीही शेतकरी ऑनलाइन अर्ज भरत नव्हते. सुरुवातीला फक्त ५ महिला शेतकरी तयार झाल्या. त्यांनी सोलार पंपावर बागायती शेती सुरू केली. आज गावात साधारण सव्वाचारशे सोलार पंप झाले असून १७५ शेतकऱ्यांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

Milk Rate । दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अनुदानासाठी ‘या’ जिल्ह्याला दररोज मिळणार ११ लाख रुपये

सोलार’वर शेती असल्याने शेतकऱ्यांना विजेचा स्वतंत्र खर्च करावा लागत नाही. खर्च कमी झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. या गावात सध्या साडेसात एच. पी. चे ११, ५ एच.पी.चे २६० व तीन एच. पी. चे १५५ शेतीपंप आहेत. वीज कनेक्शन आणि गावातच सबस्टेशन असल्यामुळे बेंबळे गावातील शेतकऱ्यांनी शेती बागायती करण्याचा निर्णय घेतला.

How to get government land on rent । सरकारी जमीन भाड्याने कशी मिळवायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *