Havaman Andaj । भारताच्या बहुतांश भागात थंडीचे आगमन झाले आहे. काही भागात तापमानात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे बर्फवृष्टी होत आहे. विशेषतः उत्तर भारत आणि हिमालयीन भागात थंडीचा प्रभाव अधिक दिसून येतो. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, शनिवारी दिल्लीत ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी किमान तापमान 6.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंश कमी आहे.
पंजाब हरियाणामध्ये तापमानात घट
शुक्रवारी पंजाब आणि हरियाणाच्या बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीमुळे लुधियानाचे किमान तापमान ३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. पंजाबमधील इतर ठिकाणांव्यतिरिक्त, अमृतसरमध्येही थंड वातावरण होते, जेथे किमान तापमान 4.8 अंश सेल्सिअस आणि पटियाला 5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भटिंडा येथेही 6 अंश तापमानासह रात्री थंडीचा कडाका जाणवला.
Milk rate । मोठी बातमी! दूध अनुदान निर्णयामागे विखे आणि थोरातांचं राजकारण?
अनेक भागात थंडी
फरीदकोट, गुरुदासपूर आणि फिरोजपूर येथेही थंडीची रात्र होती, जेथे त्यांचे किमान तापमान ५.४ अंश सेल्सिअस, ५.५ अंश सेल्सिअस आणि ५.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हरियाणातील हिसारमध्ये कडाक्याची थंडी पडली होती, जिथे किमान तापमान ३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कर्नालमध्येही थंडी कायम असून, किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
दरम्यान, अंबाला, नारनौल आणि रोहतकमध्येही कडाक्याची थंडी होती, जेथे किमान तापमान 5.9 अंश सेल्सिअस, 4.8 अंश सेल्सिअस आणि 6.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये किमान तापमान 6.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.