Success Story

Success Story । शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीतून कमावतोय लाखो रुपये, असं केलं नियोजन

यशोगाथा

Success Story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित तरुण नोकरी न करता शेतीत (Agriculture) विविध प्रयोग करत आहे. अशाच एका शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या शेतीतून आपले नशीब आजमावले आहे.

Land Rights । कामाची बातमी! बांधावरील जमिनीच्या वादावर निघाला मार्ग, मोजणीसाठी ‘हे’ यंत्र ठरतेय फायदेशीर

असं केलं नियोजन

हरियाणातील कर्नाल येथील पवन असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते अनेक वर्षांपासून पॉलीहाऊस पद्धतीने शेती (Capsicum Farming In Polyhouse) करत आहे. पॉलीहाऊसमध्ये त्यांनी काकडीशिवाय रंगीबेरंगी शिमला मिरची (Capsicum Farming) लागवड केली आहे. विशेष म्हणजे बाजारात या मिरचीला (Capsicum Cultivation) मोठी मागणी आहे. या मिरचीपासून त्यांना प्रति नेट हाऊस 5 लाखांपेक्षा जास्त नफा कमावत आहे.

Havaman Andaj । येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

समजा यंदा जर दर चांगला असेल तर हा नफा 10 लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्या शिमला मिरचीला बाजारात चांगली मागणी आहे. शिमला मिरचीचे दर बाजारात चांगले आहेत. शिमला मिरचीचा उत्पादन खर्च वजा करता त्यातून चांगले पैसे हाती येतात. ऑगस्ट महिन्यात ते मिरची लागवड करतात. 15 नोव्हेंबरपासून काढणी सुरू होऊन ती फेब्रुवारी-मार्चपर्यंत चालू राहते.

Devendra Fadanvis । मोठी बातमी! … तर सरकार करणार कांद्याची खरेदी, फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

सरकारी योजनेचा लाभ

शिवाय त्यांनी शेतात ठिबक पद्धतीने शिमला मिरचीला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. असे केल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. पवन यांना सरकारी योजनेचा देखील लाभ होत आहे. सरकारकडून पॉलीहाऊस उभारण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळत आहे. पूर्वी हेच अनुदान 65 टक्के मिळत होते. आता त्यात बदल झाला आहे.

Kisan Exhibition । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 ते 17 डिसेंबरदरम्यान पुण्यात किसान प्रदर्शनाचे आयोजन

कोणत्याही शेतकऱ्याला भाजीपाला पिकवायचा असल्यास त्याने पॉलीहाऊससारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा. कारण अल्प प्रमाणात असले तरी शेतकर्‍यांना त्यांचा नफा होईल, असे पवन यांनी सांगितले आहे. शिवाय आधुनिक पद्धतीने पिके घेतल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत देखील होत आहे.

Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *