Eggs Rate

Eggs Rate । थंडी पडताच गगनाला भिडले अंड्याचे दर! प्रति नग ‘इतके’ मिळत आहेत दर

बाजारभाव

Eggs Rate । अंडी आरोग्यासाठी खूप उपयुक्त (Eggs benefits) असतात. अनेकजण शेतीसोबत कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry farming) करतात. अंड्यांना वर्षभर मागणी असते. खास करून हिवाळ्याच्या दिवसात अंड्यांना प्रचंड मागणी असते. मागणी जास्त असल्याने अंड्यांच्या किमतीत (Eggs price) वाढ होते. सध्या असेच चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

Sharad Pawar । मी कृषीमंत्री झाल्यावर पहिली फाईल… नेमकं काय म्हणाले शरद पवार?

जाणून घ्या प्रति नग दर

शालेय पोषण आहारात देखील अंड्यांचा समावेश केला आहे. घाऊक बाजारात काही दिवसांपूर्वी साडेतीन ते चार रुपये असा भाव अंड्यांना मिळत होता. परंतु, आता राज्यातील अनेक शहरांत मागणी वाढली आहे. त्यामुळे हे दर 6 रुपये प्रति नगांवर (Eggs price hike) पोहोचले आहेत. एकीकडे शेतीमालाच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे शेतीशी संबंधित असणाऱ्या व्यवसायामुळे चांगली कमाई करता येत आहे. (Eggs Rate Increase In Maharashtra)

Onion Export । ब्रेकिंग! दोनच दिवसात घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. राज्यात आज मुंबई शहरात 6 रुपये, नागपूर येथे 5.80 रुपये, पुण्यात 6.01 रुपये असे काहीसे दर पाहायला मिळत आहेत. थंडीत अंड्याच्या मागणीत झालेली वाढ आणि जिल्हा परिषद शाळांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला जात असल्याने राज्यात दरातही सुधारणा झाली आहे.

Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी

राज्यात अंड्यांचा तुटवडा

राज्यात दररोज जवळपास 2 कोटी अंड्यांची विक्री करण्यात येते. राज्यातील अंडी उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे दररोज तमिळनाडू, आंध प्रदेश, कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात अंडी महाराष्ट्रात दाखल होतात. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील अमरावती जिल्ह्यात पोल्ट्री उद्योग मोठ्या प्रमाणात विस्ताराला आहे. या जिल्ह्यात दहा लाख अंडी उत्पादित होत असून विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांचे अंडी उत्पादन हे 20 लाखांच्या आसपास आहे.

Causes and remedies for animal clogging । जनावरांचा जार अडकण्याची कारणे व उपाय

‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’, असे म्हणतात. त्यामुळे रोजच्या नाश्त्यामध्ये अनेक जण अंड्यांचा वापर करतात. हिवाळ्याच्या दिवसात तर अंड्याला चांगलीच मागणी आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत सध्या मोठ्या प्रमाणात अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्यातील प्राथमिक शाळांच्या पोषण आहार योजनेत स्थानिक व्यवसायिकांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी पोल्ट्री व्यवसायिक करत आहे.

Signs of identifying mange in animals । जनावरांतील माज ओळखण्याची लक्षणे कोणती? पशुपालकांनो वाचा फायद्याची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *