Milk Rate Issue

Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी

बातम्या

Milk Rate Issue । दूध उत्पादकांना (Milk producers) कायम संकटांचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा दुधाचे दर (Milk Rate) पडलेले असतात. यंदाही दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. तसेच जनावरांना लागणारी पेंड, चारा, उसाच्या वाढ्यांचे दर वाढले आहेत, त्यामुळे दूध उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे. सरकारला दूध उत्पादक दूधाला (Milk) दरवाढ द्यावी, अशी मागणी करीत आहेत.

Pest control । गोचीड नियंत्रणाविषयी महत्वाची माहिती

परराज्यातील खासगी दूध संस्थांची चंगळ

दुधाचे दर २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दूध दर कमी झाल्याने दूध उत्पादक ठिकठिकाणी आंदोलन (Milk Strike) करत आहेत. सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. उलट महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे असे दुग्धविकासमंत्री सांगत आहेत. महाराष्ट्रातल्या दुधाकडे (Milk price ) संशयाच्या नजरेने पाहिले जात असून परराज्यातील खासगी दूध संस्थांची चंगळ होत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे.

Causes and remedies for animal clogging । जनावरांचा जार अडकण्याची कारणे व उपाय

सरकार नौटंकी करत आहे

दूध उत्पादकांना देखील २४ ते २५ रुपये दराने दूध विकावे लागत आहे. त्यांची त्या पाठीमागची मेहनत मोठी आहे. पंचवीस रुपयाने दूध विकणे दूध उत्पादकांना परवडत नाही. दुधाला ३४ ते ३५ रुपयांचा दर मिळाला पाहिजे. सरकारने केवळ दुधाचे दर जाहीर करण्याची नौटंकी केली असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

Signs of identifying mange in animals । जनावरांतील माज ओळखण्याची लक्षणे कोणती? पशुपालकांनो वाचा फायद्याची माहिती

खरंतर दुधाच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था अवलंबून असून याअगोदरदेखील ज्या ज्या वेळी हा व्यवसाय अडचणीत आला त्या त्या वेळी सरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे परराज्यांतील दूध संस्था राज्यातील सहकारी दूध संस्थांना मोडीत काढण्याचे काम करत आहेत. ज्यावेळी शेतकऱ्यांना दराची गरज असते त्यावेळी या संस्था कमी भाव देतात.

Jowar Bajar Bhav । ज्वारीचे भाव कडाडले! ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट

दरम्यान, आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यावर प्रत्येक वर्षी संकटाची मालिका सुरू असते. राज्याला कधी कोरडा, तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशातच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतीसोबत जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला काही दिवसांपासून उतरती कळा लागली आहे.

Export Ban on Onion । शेतकऱ्यांचे आंदोलन धडकणार दिल्लीत, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *