Onion Export Ban

Onion Export Ban । शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका! सरकारनं घातली कांद्याच्या निर्यातीवर बंदी

बातम्या

Onion Export Ban । यंदा पावसामुळे कांद्याची (Onion) खूप नासाडी झाली आहे. असे असूनही कांद्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. अजूनही कांद्याचे दर (Onion Rate) खूप पडले आहेत. राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर कांदा कवडीमोल दरात विकण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांना कांदा परवडत नसल्याने ते फेकून देत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड (Cultivation of Onion) केली जाते.

Neera Deoghar Project । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पहिल्यांदाच बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे मिळणार पाणी

सरकारने काढले परिपत्रक

अशातच आता कांदा उत्पादकांना निराश करणारी एक बातमी आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर (Onion Price) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी (Export Ban) घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. यावरून राज्याचे वातावरण पुन्हा एकदा पेटू शकते. ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत राहील, याबाबत एक परिपत्रक काढलं आहे.

Success Story । नोकरी नाही तर फुलशेती करून उच्च शिक्षित तरुणाने कमावलं लाखो रुपये, असं केलं नियोजन

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मनमाड, लासलगाव, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद असून नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला आहे. शेतकरी आणि कांदा व्यापारी कमालीचे नाराज झाले आहे. दिल्लीत स्थानिक विक्रेते 70 ते 80 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री (Sale of onions) केली जात आहे. परंतु, आता सरकारच्या या निर्णयानंतर दरात घसरण होईल.

Banana Farming । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! आता केळीपासून बनणार बिस्किटे, कसं ते जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

केंद्र सरकारने (Central Govt) या निर्णयापूर्वी ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरानेत कांदा देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनावेळी आर्थिक मदतीची अपेक्षा होती, परंतु, त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ठीक-ठिकाणी कांदा उत्पादकांची आंदोलनं सुरु आहेत.

Farm Pond Subsidy । सावधान! तुमचेही बॅंक खाते आधार संलग्न नसेल तर मिळणार नाही शेततळ्यांचे अनुदान

तातडीने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा….

दरम्यान, भारतात उत्पादित होणारा कांदा विविध देशांत निर्यात करतात. खास करून परदेशात खूप मागणी आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. सरकारच्या निर्णयामुळे निर्यातीवर परिणाम होईल. केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावरती दिसेल, असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

MNREGA Job Card । बिग ब्रेकिंग! १० लाखांपेक्षा जास्त मनरेगा जॉब कार्ड रद्द, नेमकं कारण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *