Milk Price

Milk Price । राज्यात दुधाचे दर का कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

पशुसंवर्धन

Milk Price । देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय करतात. अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. या व्यवसायात जर जास्त नफा मिळवायचा असेल तर जास्त फायदा मिळवून देणाऱ्या जनावरांचे पालन करावे लागते. परंतु, सध्या हा व्यवसाय तोटयात आला आहे. यामागचे कारण म्हणजे घसरलेले दुधाचे दर (Milk Rate). कमी दुध (Milk) दरावरून राज्यात वातावरण तापले आहे.

Agriculture Subsidy । विहिरीसाठी मिळतंय चार लाख रुपये अनुदान; लगेचच करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

दूध दरावरून दूध उत्पादक वर्ग कमालीचा नाराज झाला आहे. एकीकडे दूध उत्पादनाचा खर्च (Maharashtra Milk Price Issue) वाढत चालला आहे तर दुसरीकडे दर कमी (Milk Price Falls Down) झाले आहेत. एकंदरीत याचा फटका दूध उत्पादकांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य दूध (Maharashtra Milk Price) उत्पादनात अग्रेसर आहे. सहकारी आणि खासगी दूध संस्थांच्या माध्यमातून दूध व्यवसायाला (Milk business) उभारी आली आहे.

Havaman Andaj । ‘या’ राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल, मिचॉन्ग चक्रीवादळाचं संकट; 5 डिसेंबरला धडकणार

जाणून घ्या दर कमी जास्त होण्याचे कारण

वास्तविक राज्यात संघटीत क्षेत्रात 1 कोटी 30 लाख लिटर दुध संकलित होते त्यापैकी 90 लाख लिटर दुध पाऊच पॅकद्वारे घरगुती गरज भागवण्यासाठी रोज खर्च होते. ही गरज भागवून 40 लाख लिटर दुधाची पावडर आणि बटर बनते. घरगुती गरजेपेक्षा 40 लाख लिटर दुध राज्यात अतिरिक्त (सरप्लस) निर्माण होते. हे सरप्लस दुध, दुध भावाच्या चढ आणि उताराचे कारण बनते.

Eucalyptus Farming । ‘या’ एका झाडाची लागवड केल्यास शेतकरी होईल मालामाल; खर्च कमी आणि लाखोंचा नफा

दुध क्षेत्रात किमान स्थिरता नसल्याने राज्यात दुध क्षेत्राच्या प्रगतीला मोठी बाधा निर्माण झाली आहे, असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Navale) म्हणाले. दुधाचे खरेदी आणि विक्रीचे दर एका पातळीवर स्थिर असेल तर गुंतवणुकीसाठी किमान पोषक वातावरण निर्माण होते. तरल दुध विक्रीबाबत अशी किमान स्थिरता पाऊच पॅक दुधाबाबत निर्माण झाली असून दुध पावडरचे दर आंतराष्ट्रीय बाजाराशी जोडले गेले आहेत.

Banana Farming । बापरे! केळीच्या बागेतून 9 महिन्यात केली तब्बल 80 लाखाची कमाई, कसं केलं नियोजन? एकदा वाचाच

आंतराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या चढ आणि उतारानुसार दुधाचे खरेदीदर वाढतात किंवा पडतात. तसेच ‘फ्लश’ सीजनमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात दुधाचा पुरवठा वाढतो, त्यामुळे दुधाचे दर पडतात. मुख्यता आंतराष्ट्रीय बाजारात पडलेले दुध पावडरचे दर यामुळे दुध खरेदीदर कमी करण्यासाठी वारंवार वापरले जाते, असे अजित नवले म्हणाले.

Sugarcane Variety । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ उसाच्या जातीची लागवड! देईल साखरेचा जास्त उतारा आणि पाणीही लागेल कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *