Price of flour and pulse । मागील काही दिवसांपासून महागाई (Inflation) वाढत चालली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होत आहे. सर्वसामान्यांना प्रत्येक वस्तू पूर्वीपेक्षा जास्त दराने खरेदी कराव्या लागत आहेत. साहजिकच त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडत चालले आहे. अशातच आता सर्वसामान्यांना महागाईची झळ (Inflation in India) सहन करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीठ आणि डाळींच्या किमतीत होणार वाढ
कारण स्थानिक पातळीवर पीठ आणि डाळींच्या किमतीत वाढ (Flour and Pulse Price Hike) होण्याची शक्यता जास्त आहे. पावसाचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. यंदा राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अपेक्षित पेरण्या (Flour and Pulse Price) होऊ शकल्या नाहीत. पेरण्या न झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यात गहू (Flour Price Hike) आणि डाळींच्या (Pulse Price Hike) देखील पेरण्या कमी झाल्या आहेत.
Bee Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण जखमी
कमी पेरण्या
टक्केवारीचा विचार करायचा झाला तर गव्हाच्या पेरणीत 5 टक्क्यांपेक्षा जास्त घट तर डाळींच्या पेरणीत आठ टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा 141 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली असून गेल्या वर्षी या कालावधीत 149 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. तसेच यंदा 940 लाख हेक्टरवर डाळींची पेरणी झाली असून मागील वर्षी या कालावधीत 103 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.
कमी पेरण्यांमुळे पीठ आणि डाळींच्या किमती वाढणार आहे. असे झाले तर देशात महागाई आणखी वाढू शकते. आतापर्यंत या दोन्ही पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाऊस पडला नाही. पाऊस पडला तरच ही टंचाई भरुन निघेल, अशी सरकारला आशा आहे. तज्ञांच्या मतानुसार पेरणी वाढली नाही तर देशात डाळी आणि गहू किंवा मैदा आणि डाळीच्या किंमती देखील वाढतील.
Tur Market । शेतकऱ्यांना तुरीमुळे अच्छे दिन! नवीन तुरीला मिळणार ‘इतका’ भाव
वाढेल चलनवाढीचा दर
साहजिकच यामुळे देशात चलनवाढीचा दर वाढेल. काही महिन्यांपूर्वी सर्वसामान्य जनतेला टोमॅटो आणि कांद्याच्या महागाईचा सामना करावा लागला होता. आताही पीठ आणि डाळीच्या बाबतीत तसे होऊ शकते. असे झाले तर सर्वसामान्यांना याचा खूप मोठा फटका सहन करावा लागेल. येत्या काळात पीठ आणि डाळीच्या किमतीत किती वाढ होतेय? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी