Cultivation of silk । शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने नवनवीन योजना (Government Schemes) सुरु करत असते. ज्याचा फायदा देशातील कोट्यवधी शेतकरी घेत आहेत. परंतु, काही शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात, कारण त्यांना या योजनांबद्दल माहिती नसते. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यावर मात करत ते शेती करतात. यावेळी या योजना (Schemes) फायदेशीर ठरतात.
अनेकजण आता शेतीसोबत व्यवसाय सुरु करतात. यासाठी गरज असते ती म्हणजे योग्य त्या नियोजनाची आणि कष्टाची. मनात जर जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नसते. अनेक शेतकरी रेशीम लागवड करतात. परंतु, काही जणांकडे लागवडीसाठी आवश्यक तेवढे पैसे नसतात, शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने महा रेशीम अभियान (Sericulture) सुरु केले आहे. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा (Government Subsidy) होत आहे.
Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी
किती मिळते अनुदान?
शेतकऱ्यांना या अभियानातंर्गत रेशीम लागवडीसाठी 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदान मिळत (Sericulture Subsidy) आहे. खरंतर रेशीमसाठी तुतीच्या झाडाची लागवड करण्यात येते आणि या तुती लागवडीसाठी महारेशीम अभियानांतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख 86 हजार 186 रुपयांचे अनुदान मिळते. जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत गावोगावी महारेशीम अभियान राबविले जाते.
Dairy Farming । शेतकऱ्याची अशीही कृतज्ञता, म्हशीच्या मृत्यूनंतर दिल अख्ख्या गावाला जेवण
या अभियानामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होते. रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांना 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदान मिळत असून पूर्वी योजना जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविली जात होती. योजनेची व्यापकता वाढावी, यासाठी योजना जिल्हा परिषद, कृषी विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राबविले जाणार आहे.
शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
तुती रेशीम उत्पादनासाठी रेशीम उत्पादन प्रक्रियेत तीन प्राथमिक पायऱ्या असून मोरी कल्चर तुतीच्या पानांची लागवड रेशीम किड्यांचे संगोपन रेशीम किड्यांच्या वाढीस चालना मिळते. योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. आठ महिने पाणीपुरवठा असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर 500 रुपये आणि आवश्यक ती कागदपत्रे जिल्हा रेशीम कार्यालयाकडे जमा करून नाव नोंदणी करावी लागेल.
Success Story । इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याचं पुढचं पाऊल! ‘या’ पिकाच्या लागवडीतून केली लाखोंची कमाई