Success story । शेतीत कोण काय करू शकेल हे काही सांगता येत नाही. अनेक तरुण आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पिके सोडून आधुनिक पद्धतींच्या पिकांचा प्रयोग (Farmers success story) करत आहेत. या पिकांना बाजारात चांगली मागणी असते. मागणी जास्त असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना (Government Schemes) सुरु करते.
Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी
विशेष म्हणजे उच्च शिक्षित तरुणदेखील नोकरी सोडून शेती करत आहेत. युवा शेतकरी नवनवीन पिकांचा प्रयोग करत आहेत. अशाच एका तरुणाने जर्मनीतील नोकरी सोडून वाटाणा शेती (Pea farming) करायला सुरुवात केली आहे. या शेतीतून (Pea farming information) या तरुणाने 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजित प्रताप असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात राहतो.
Dairy Farming । शेतकऱ्याची अशीही कृतज्ञता, म्हशीच्या मृत्यूनंतर दिल अख्ख्या गावाला जेवण
अजित प्रताप यांनी जर्मनीमध्ये काम केल्यानंतर, भारतात परत येऊन शेती करायचा निर्णय घेतला. त्यांनी वाटाणा उत्पादनातून करोडो रुपयांचा नफा मिळवला. त्यांच्या यशाने समाजात वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर शेतकरी बागायती पिके घेत आहेत. अजित यांनी IIIBM इंदूर येथून एमबीएचे शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी जर्मनीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्येही काम केले.
अशी केली शेतीला सुरुवात
अजित यांनी शास्त्रोक्त पद्धतीने एकूण 25 एकर जमिनीवर वाटाणा लागवड (Planting peas) केली. लागवडीसाठी त्यांनी न्यूझीलंड आणि इतर काही देशांतून बियाणे आणले. शेतीसाठी त्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. सध्या ते लागवड (Pea farming cultivation) आणि बियाणे उत्पादनातून वर्षाला 5 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसात वाटाण्याला जास्त मागणी असते.
Success Story । इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याचं पुढचं पाऊल! ‘या’ पिकाच्या लागवडीतून केली लाखोंची कमाई
किती होते कमाई?
शेतीसोबतच अजित यांनी मटारची प्रतवारी, प्रक्रिया आणि पॅकेजिंगसाठी दोन युनिट्स उभारले. विक्रीसाठी वाटाणा ते बांगलादेश, युरोप आणि नेपाळसारख्या अनेक देशांमध्ये पाठवतात. शेतीमुळे इतरांना देखील रोजगार मिळाला. एका एकर वाटाणा पिकवण्यासाठी त्यांना 15 हजार रुपये खर्च आणि अंदाजे 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. ते मटारचे गुच्छ बनवून शेती करत असल्याने पाण्याची मोठी बचत होते.