kusum solar pump scheme

Kusum Solar Pump Scheme । वीजबिलाची संपली कटकट! कुसुम सौर पंप योजनेत मिळत आहे 90 टक्के अनुदान

शासकीय योजना

Kusum Solar Pump Scheme । पिकांना पाणी देणे तसे खूप अवघड काम आहे. कारण प्रत्येक वेळी शेतात वीज असतेच असे नाही. अनेकवेळा तर पाणी असून विजेविना पिके जळून जातात. केंद्र सरकारने याच पार्श्वभूमीवर कुसुम सोलर पंप योजनेला सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. परंतु या योजनेसाठी काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. जाणून घेऊयात सविस्तर.

योजनेचे लाभार्थी

शेतकरी
सहकारी संस्था
जल ग्राहक संघटना
शेतकर्‍यांचा गट
शेतकरी उत्पादक संस्था

काय आहेत वैशिष्ट्य?

राज्यातील एकूण 34 जिल्ह्यात पारेषण विरहित 3814 कृषी पंपाची स्थापना करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देता येणार आहे. स्वखर्चाने इतर उपकरनेही त्याला जोडता येतील. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी कृषिपंप किमतीच्या 10 टक्के आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा लाभार्थी राहील.

नियम

बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत शेतामध्ये असावा. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या क्षेत्रानुसार सौर पंप मिळतील. 2.5 एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 HP, 5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP, 5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाईल.

महत्त्वाची कागदपत्रे

त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद आवश्यक,सातबारा उतारा, बँक खाते विवरण, आधार कार्ड, रेशन कार्ड, नोंदणी प्रत, प्राधिकरण पत्र, पासपोर्ट साईझ फोटो, जमीन प्रत, मोबाइल नंबर

फी

०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
१ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
१.५ मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
२ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी

कोठे करावा अर्ज?

या योजनेअंतर्गत खुला प्रवर्ग 90 टक्के आणि SC-ST साठी 95 टक्के अनुदान मिळते आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी https://www.mahaurja.com/meda/en/node या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *