Dairy Farming । शेतीत ज्या शेतकऱ्यांना फारशी कमाई न करता आल्याने ते शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय सुरु करतात. हा व्यवसाय सुरु करताना जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. तरच हा व्यवसाय करावा, अन्यथा पशुपालक आर्थिक संकटात येऊ शकतात. सध्या विविध जातींच्या गाई, म्हशी उपलब्ध आहेत. ज्याच्या मार्फत तुम्हाला चांगली कमाई करता येईल.
पशुपालक आपल्या जीवापलीकडे पशूंना जीव लावतात. पशूदेखील तितकाच जीव आपल्या मालकाला लावतात. समजा एखादा पाळीव प्राणी मृत्युमुखी पडला तर काही पशुपालक त्यांचा विधिवत दहावा विधी आणि उत्तरकार्य करतात. वाचून तुम्हालाही नवल वाटेलच असणार. परंतु हे सत्य आहे, उत्तर महाराष्ट्रात अशी प्रकरणे घडल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे.
Success Story । इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याचं पुढचं पाऊल! ‘या’ पिकाच्या लागवडीतून केली लाखोंची कमाई
दिले संपूर्ण गावाला जेवण
हरियाणा राज्याच्या चरखी दादरी गावातील सुखबीर सिंह या शेतकऱ्याने आपल्या म्हशीचा (Haryana Buffalo) मृत्यू झाल्यानंतर अख्ख्या गावाला जेवण दिले आहे. सुखबीर सिंह यांच्या वडिलांनी तब्बल २८ वर्षांपूर्वी बाजारातून एक म्हैस (Buffalo) खरेदी केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत या म्हशीने एकूण २४ पारडासांना जन्म दिला. त्यांची विक्री करून सुखबीर सिंह (Sukhbir Singh) यांच्या कुटुंबांना खूप आर्थिक लाभ झाला.
केली उपकाराची परतफेड
त्यामुळे या म्हशीच्या उपकाराची परतफेड म्हणून सुखबीर सिंह यांनी संपूर्ण गावाला जेवण दिले. म्हशीच्या निधनानंतर सुखबीर सिंह यांनी म्हशीचे अस्थिविसर्जन, दहावा, तेरावा आणि उत्तरकार्य केले. या कार्यक्रमाला नातेवाईकांसह तब्बल ४०० नागरिकांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर कार्यक्रमात देशी तुपासह, दुधापासून बनवलेले पंचपक्वान्न ठेवले होते. यामध्ये गुलाब जामून, भात, पुरी, भाजी यांचा समावेश होता.
Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा
सुखबीर सिंह यांनी आपल्या लाडक्या म्हशीचे नाव ‘लाडली’ असे ठेवले होते. या म्हशीमुळे आपल्या कुटुंबाला खूप फायदा झाला, असे सुखबीर सिंह सांगतात. आपल्या लाडक्या म्हशीच्या ऋणानुबंधनातून मुक्त होण्यासाठी त्यांनी म्हशीच्या मृत्यूनंतर सर्व विधी करत संपूर्ण गावाला जेवण दिले. त्यामुळे सध्या या म्हशीची खूप चर्चा केली जात आहे.
Potato and rice prices । अवकाळी पावसाने पिकांची नासधूस, कांद्यापाठोपाठ बटाटे आणि तांदळाचे भाव वाढले