Success Story । शेतकरी आता विविध प्रकारचे पिके घेत आहेत. त्यांना या पिकांच्या माध्यमातून चांगला नफा मिळत आहेत. शेती करताना योग्य नियोजन आणि जास्त मेहनतीची गरज असते. त्याशिवाय यश मिळत नाही. तसेच कोणतेही पीक लागवड करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करावा. अनेकजण उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. उसाच्या देखील अनेक जाती आहेत.
Cabinet Meeting । शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्वांचे लक्ष
फक्त शेतकरी नाही तर उच्च शिक्षित तरुण शेतीकडे वळू लागला आहे. अशातच एका सेवानिवृत्तीनंतर माध्यमीक शिक्षकाने उसाचे उत्पादन (Farmer Success Story) घेतले आहे. यात त्यांना एकरी ९७ टन उत्पादन (Sugarcane production) मिळवता आले आहे. जवखेडे (ता.पाथर्डी) येथील एका सेवानिवृत्त माध्यमीक शिक्षकाने चिकणी नावाचे बरड जमिनीत ऊसशेती फुलवली आहे. यासाठी त्यांनी योग्य नियोजन आणि अथक परिश्रम केले.
असे केले नियोजन
हनुमान चितळे यांनी सुरुवातीला पंधरा एकर जमीनीचे सपाटीकरण करून बांधबधीस्ती केली. त्यानंतर त्यांनी एक विहीर खोदली. पिकांसाठी पाईपलाईन करून ठिबक संच बसवुन अकरा एकर क्षेत्रात तीन प्लॉट करून पुर्व पश्चिम पाच फुटी सरी काढली. जुन २०२२ मध्ये २६५ जातीच्या आडसाली ऊसाची दोन डोळे पद्धतीने लागवड (Sugarcane cultivation) करून सव्वा महीना बाळबांधणी होईपर्यंत दोन खुरपण्या केल्या.
Bank Loan । शेती कर्जाचे पुनर्गठन करायचंय? तातडीने करा हे काम, बंद होईल कर्ज वसुलीची कटकट
त्यांनी काही दिवस फ्लो पद्धतीने पाणी देऊन आंतरमशागत करताना ठिबक संच बसवला. क्षारयुक्त पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी एक मोठा फिल्टर बसविला. त्याशिवाय शेजारीच विद्राव्य खते देण्यासाठी पुरक जोडणी केली. डाळींचे पीठ, गुळ, ताक, विद्राव्य खतांचा एनपीके संतुलीत डोस, गोमुत्र, शेण यांचे पंचकाव्य स्लरी मिश्रण दिल्याने एक मजुराचे मदतीने देणे फायद्याचे ठरले.
Pipeline Subsidy । आता पाईपलाईनसाठी मिळेल 50% अनुदान, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज?
एकरी मिळाले ९७ टन उत्पादन
चितळे यांच्या उसाला १४ नोव्हेंबरला तोडणी केली. प्रतीदीन सात ते आठ तर कधी नऊ टायरगाडी ऊस भरून मागील प्रती टायर गाडीचे वजन तीन अडीच ते तीन टन भरत आहे. त्यांच्या २० नोव्हेंबर अखेर ४५ टायरगाडी एक एकरांत भरून गेल्या आहे. उसातून त्यांना एकरी सत्याण्णव टनाचे उत्पादन घेता आले आहे. सेवानिवृत्तीनंतर ऊस शेतीत मशागत केल्याने समाजपुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.
Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान