Havaman Andaj । नोव्हेंबर महिना जवळपास संपत आला दिवसात कडाक्याची थंडी पडते. परंतु, देशासह राज्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत.
Buffalo Rearing । पशुपालकांची होणार चांदी! मुऱ्हा नाही तर ‘या’ जातीची म्हैस देते 500 लिटर पर्यंत दूध
नैऋत्य अरबी समुद्रापासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाच्या हवेचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्याला अवकाळी पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनने परतीची वाट धरल्यानंतर अवकाळीचं संकट राज्यावर आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) पडत आहे.
Electricity । कधीच होणार नाही वीजपुरवठा खंडित! शेती आणि गावासाठी मिळणार विजेची स्वतंत्र लाईन
चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Rain Forecast) पडू शकतो. या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. आग्नेय राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा कमी झाला आहे. तसेच नैर्ऋत्य अरबी समुद्रात, तसेच दक्षिण श्रीलंकेजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याचेही पाहायला मिळत आहे.
Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार
येलो अलर्ट जारी
विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहेत. आज नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर उरलेल्या राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पाऊस (Weather Update ) पडू शकतो.
Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
इतकेच नाही तर पुढील चार ते पाच दिवस देशाच्या तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी भागात हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडू शकतो. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशात धुक्याचं प्रमाण जास्त आहे. देशाच्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी तेथील किमान तापमानात लक्षणीय घट नोंद पाहायला मिळेल. तापमान कमी झाल्याने हवेत गारवा निर्माण होणार आहे.
Fertilizers licenses । राज्यातील विकास सोसायट्यांना मिळणार खतविक्रीचा परवाना, सहकार खात्याचा आदेश