Coriander Rate । आपल्याकडील अनेक शेतकरी ही कोथिंबीरीची लागवड करतात. कोथिंबीर लागवडीतून शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात नफा मिळतो यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्या लागवडीकडे कल वळलेला आहे. मात्र सध्या कोथिंबीर उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणी सापडले आहेत. कोथिंबीरच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कोथिंबीर पेरणी आणि काढणीसाठी लागणारा खर्च देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. (Coriander Rate)
Benefits of using alum in agriculture । शेतीत तुरटी वापरण्याचे फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
सध्या कोथिंबिरीला 25 ते 30 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे. बाजारात कोथिंबीर घेऊन आलेले बरेच शेतकरी रात्री जर कोथंबीर उरली तर ती घरी नेण्याऐवजी त्याच ठिकाणी ठेवून जात आहेत. दिवाळीच्या वेळी दरवर्षी कोथिंबिरीला चांगला भाव मिळत असतो. यामुळे अनेक जण दिवाळीत विकता येईल अशा पद्धतीने कोथिंबिरीची पेरणी करतात. मात्र यंदा दिवाळीत कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोथिंबीर काढण्यासाठी त्याचबरोबर त्याच्या पेंड्या बांधण्यासाठी लागणारा रोजगार देखील अंगलट येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. शनिवारी लातूरच्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कोथिंबीरिची आवक झाली होती. त्यामुळे अनेकांनी पाव किलो पेक्षा अधिकची जोडी दहा रुपयांना विक्री केली. उशिरापर्यंत विक्री न झालेली कोथिंबीर जागेवरच ठेवून काहींनी गाव गाठले.
Tur Rate । तूरीला सध्या किती भाव मिळतोय? उत्पादनात मोठी घट, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?
मागच्या आठ दिवसापासून लातूरच्या बाजार समितीत कोथिंबिरीच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. प्रतिक्विंटल दीड ते दोन हजार रुपयापर्यंत दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याचबरोबर किरकोळ बाजारामध्ये कोथिंबिरीची विक्री 30 ते 40 रुपये किलोने होत आहे. हे दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोथिंबिरीसाठी झालेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आता चिंतेत आहेत.
Red Chilli । लाल मिरचीची आवक वाढली! प्रतिक्विंटल मिळतोय तीन हजार ते साडेसहा हजारांचा दर
दरम्यान, लातूर बाजार समितीसह इतर बाजार समितीत देखील कोथिंबिरीचे भाव हे कमीच आहेत. काल छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बाजार समितीत 22 हजार कोथिंबीरीच्या नगांची आवक झाली याला जवळपास सर्वसाधारण 275 रुपये भाव मिळाला. त्याचबरोबर पुण्यात मांजरी या ठिकाणी २५ हजार १८० नग कोथींबीरीचे आवक झाली. प्रतीनग चार रुपये एवढा कमी भाव कोथिंबिरीला मिळाला आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.
Onion Price । कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! महिन्यातच दरात मोठी घसरण