Tomato Price । टोमॅटो उत्पादकांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. टोमॅटोच्या दराने पुन्हा एकदा उच्चांकी गाठली आहे. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोने १०० रुपयांचा (Tomato rate) टप्पा पार केला होता. काही शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तर काही शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फायदा झाला होता. वाढलेल्या दरामुळे टोमॅटो उत्पादकांची चांदी झाली होती. ग्राहकांना जास्त किमतीने टोमॅटो खरेदी करावा लागत होता.
परंतु, मागील काही महिन्यापासून पुन्हा टोमॅटोचे दर पडले होते. अशातच आता पुन्हा एकदा टोमॅटोचे दर वाढले (Tomato rate hiked) आहेत. टोमॅटोचे दर ६० रुपयांवर गेला आहे. जून ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत टोमॅटोचे दर चांगलेच तेजीत राहिले होते. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात २० नोव्हेंबपर्यंत १६९० हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे.
सर्व भाज्यांचे वाढले दर
मागील दहा दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक ५ ते १० टक्क्यांनी घातली आहे. घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रतिकिलो २ ते १२ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात कारले, शिमला मिरची, भेंडी, फरसबी, गवार, पडवळ, सुरण भाज्यांचा समावेश असून किरकोळ बाजारात या भाज्यांचे दर १० ते २० रुपयांनी वधारले आहेत. सर्व भाज्या ६० ते ८० रुपयांवर गेल्या आहेत.
Milk Rate | दूध दराबाबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक! नेमका काय झाला निर्णय?
…तर दर कमी होणार
नारायणगाव, सातारा, नाशिक आणि सोलापूरसह राज्याच्या इतर भागांतील टोमॅटो उत्पादनात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याशिवाय कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तेलंगणातून होणारी आवक देखील बंद झाली आहे. फक्त नाशिकमधून आवक सुरू असून पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत दर तेजीत राहू शकतात. रब्बी हंगामातील टोमॅटो बाजारात आल्यानंतर दर कमी होतील.
दरम्यान, टोमॅटोचे दर पुन्हा एकदा वाढल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अच्छे दिने आले आहेत. परंतु, वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना तोटा होत आहे. नागरिकांना आता पूर्वीपेक्षा जास्त किमतीने टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत. काही दिवस टोमॅटोचे दर असेच कायम राहतील.