Havaman Andaj

Havaman Andaj । बिग ब्रेकिंग! पुढील ४ दिवस अवकाळीचं सावट, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना दिला जोरदार पावसाचा इशारा

हवामान

Havaman Andaj । नोव्हेंबर महिना सुरु होताच तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD Alert) काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची (Maharashtra Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Encroachment On Land । काय आहे खासगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, पुणे, मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Maharashtra Rain Alert) हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर काही ठिकाणी झाडे देखील कोसळली. राज्यावर अवकाळीचं संकट कायम राहील, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला.

Land Ownership । जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या गोष्टींमुळे बदल होतात? वाचा सविस्तर

हवामान खात्याने येत्या ४ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. खरीप हंगामातील पीके काढणीला वेग आला आहे. त्यामुळे अनेकांनी पिके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असेही आवाहन हवामान खात्याने केले आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे हवामान खात्याचे मत आहे.

Milk Production । देशातील ‘या’ राज्यात होते सर्वाधिक दूध उत्पादन, पहा यादी

या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

हवामान खात्याकडून मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून पुढील २४ तासांत पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, लातूर, नांदेड अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.

Drought in Marathwada । “मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, नाहीतर 10 हजार शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू” – रोहित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *