Havaman Andaj

Havaman Andaj । येत्या दोन दिवसात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने जारी केला येलो अलर्ट

हवामान

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. राज्यात सध्या सकाळी वातावरणाचा गारवा तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्याच्या काही भागात आता थंडीची चाहूल लागली असताना हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (IMD Alert) दिला आहे.

Crop Insurance । आधार लिंक नसेल तर तुम्हालाही मिळणार नाही पिकविमा भरपाई, जाणून घ्या महत्त्वाचा नियम

या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

हवामान खात्याने (IMD) राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस (Maharashtra Rain) पडू शकतो. आज कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या

त्याशिवाय उद्या कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी या पाच जिल्ह्यांत येलो अलर्ट तसेच शुक्रवारी आणि शनिवारीह काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 6 दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Sandalwood Farming । शेतकऱ्यांनो करा ‘हे’ काम, तुम्हालाही चंदन लागवडीतून करता येईल करोडोंची कमाई

नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

आज रात्रीपासून पश्चिम हिमालयीन भागावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हलका पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Krushi Yojna । मागेल त्याला योजनेत लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? फक्त एकाच क्लिकवर तपासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *