Havaman Andaj । यंदा देशात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यात काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने आता पिके करपू लागली आहेत. राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशातच आता हवामान खात्याकडून (IMD Update) पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.
दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच गोव्यातही हवामान खात्याने पावसाचा इशारा (IMD Alert) दिला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दिल्लीतदेखील अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
Havaman Andaj । नागरिकांनो, सावधान! हवामान खात्याचा ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात थंडीची प्रतीक्षा असली तरी अजूनही उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील सांताक्रूझ येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ आणि रत्नागिरी वगळता उरलेली सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या आसपास आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे.
Maharashtra Drought । दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर
राजस्थानचे हवामान
हवामान खात्याच्या मतानुसार, राजस्थानमध्ये पावसाची शक्यता नाही. देशाच्या बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे. उत्तर-पश्चिमच्या काही भागात तशी शक्यता नाही. या ठिकाणी हवामान थंड असेल.
Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध