Fodder Crop । अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतात. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यासाठी आवशक्यता असते ती म्हणजे योग्य त्या नियोजनाची आणि प्रचंड मेहनतीची. पशुपालनामुळे शेतीसाठी शेणखत उपलब्ध होते. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागात दडी मारली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Custard Apple । देशी सीताफळाची चवच न्यारी! मागणीमुळे दरात मोठी वाढ
जनावरांना जर मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असेल तर त्याचा दुधावर कोणता परिणाम होत नाही. परंतु जर जनावरांना चाराचं उपलब्ध नसेल तर त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होतो. जर तुम्ही पौष्टिक चाऱ्यासाठी पर्याय शोधत असाल तर तुम्ही आता लसूणघास चारा पिकाची लागवड (Grass Fodder Crop) करू शकता. जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून अनेकजण या चाऱ्याची लागवड (Grass Fodder Cultivation) करतात.
Success Story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! एक एकर आल्यातून केली १२ लाखांची कमाई
लसूणघास हा एक द्विदल प्रकारातील पौष्टिक चारा आहे. लुसलुशीत, हिरवेगार असणाऱ्या इतर चारापिकांपेक्षा लसूणघासामध्ये आपल्याला प्रथिने पाहायला मिळतात. या पिकाची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी जमिन असावी लागते. जमिनीचा सामू 7 ते 8 आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन भुसभुशीत व तण विरहित असावी.
Havaman Andaj । सावधान! हवामान खात्याने दिली पावसाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या
सुधारित जाती
पुन -1 बी, ल्युसर्न – 9 , आर. एल. -88, आनंद -2, आनंद -3 आणि सिरसा -9 स्थानिक या जाती आहेत.
Black Austrolorp । कडकनाथ नाही तर ‘ही’ कोंबडी मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न, आजच करा पालन
पाणी
हे पीक वर्षभर हिरवा चारा पुरविणारे पीक आहे. त्यामुळे लागवडीपूर्वीच पाण्याची सोय करा. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्या. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात 8 ते 10 दिवसांनी आणि हिवाळ्याच्या दिवसात 10 ते 12 दिवसांनी पाणी द्या.
लागवड
या पिकाची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात करतात. उगवणीसाठी हवामान थंड असावी. पेरणीसाठी हेक्टरी 25 ते 30 कि. बियाणांचा वापर करावा. लागवडीवेळी दोन ओळीत 25 ते 30 से.मी. अंतर ठेवा. लागवडीसाठी सुधारित वाण आरएल 88 ची निवड करा.
खते
या पिकाला हेक्टरी 40 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगले मिसळून द्या. लसूण घास स्फुरद व पालाश या खतांना चांगला प्रतिसाद देत असल्याने पेरणीपूर्वी हेक्टरी 20 कि.ग्रॅ. नत्र, 150 कि.ग्रॅ. स्फुरद आणि 40 कि.ग्रॅ. पालाश प्रमाणात द्या.