Custard Apple

Custard Apple । देशी सीताफळाची चवच न्यारी! मागणीमुळे दरात मोठी वाढ

बातम्या

Custard Apple । कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवून देणारे फळ म्हणून सीताफळाची ओळख आहे. या फळाचा प्रामुख्याने हंगाम जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये असतो. क्वालिटीनुसार सीताफळांचे दर मिळत असतात. देशी सीताफळाची चवच खूप चांगली असते. त्यामुळे त्यांना बाजारपेठेत खूप मागणी असते. (Custard Apple Price)

Success Story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! एक एकर आल्यातून केली १२ लाखांची कमाई

सध्या आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सीताफळांचे दर खूप वाढले आहेत. महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यात सातपुड्यातील सीताफळांची खूप मागणी (Production of Custard Apple) असते. यावर्षी राज्याच्या काही भागांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सीताफळांची बाजारात कमी प्रमाणात आवक होऊ लागली आहे. आवक कमी झाल्याने सीताफळांचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.

Havaman Andaj । सावधान! हवामान खात्याने दिली पावसाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या

उत्पादनात प्रचंड घट

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव,अक्कलकुवा तालुका आणि सीमावर्ती भागातील गुजरातच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील सीताफळांना खूप मागणी असते. यामुळे आदिवासी लोकांना रोजगार मिळतो. कमी पावसामुळे यंदा बाजारपेठेत सिताफळाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याची पाहायला मिळत आहे. सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होत आहे.

Black Austrolorp । कडकनाथ नाही तर ‘ही’ कोंबडी मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न, आजच करा पालन

70 रुपये किलोपर्यंत दर

सध्या बाजारपेठांमध्ये फळाच्या आकारावर सिताफळांना 50 रुपयांपासून तर 70 रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. दरम्यान, हे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. दर वाढल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचा फायदा जरी शेतकऱ्यांना होत असला तरी ग्राहकांना ते नेहमीपेक्षा जास्त किमतीत खरेदी करावे लागत आहेत.

Crop competition । शेतकरी मित्रांनो! रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *