Onion Price

Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती

बातम्या

Onion Rate । मागील काही दिवसांपासून कांदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. केंद्र सरकार कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कोणते ना कोणते प्रयत्न करत असते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कांद्याचे दर वाढले (Onion Price Hike) आहेत. याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. एकेकाळी कवडीमोल भावात विकला जाणारा कांदा आज 50 रुपयांच्या वर विकला जात आहे.

Gas Cylinder Price । महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याच्या किमती वाढल्या (Onion Price) आहेत. देशात अगोदरच दिवसेंदिवस महागाई वाढली आहे. त्यातच सर्वसामान्यांना आता दुप्पट किमतीने कांदा खरेदी करावा लागत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार हे जवळपास निश्चितच आहे. 30 ते 35 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आज 75 ते 80 रुपयांवर पोहोचला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील ५ दिवस या ठिकाणी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज

कांद्याच्या दरांवर येणार नियंत्रण

तज्ज्ञांच्या मतानुसार, अपुऱ्या पावसामुळे कांद्याच्या किमतीत वाढ झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर किमती वाढल्याने सर्वसामान्यांना खूप मोठा झटका बसला आहे. परंतु आता एक शेतकऱ्यांना धक्का देणारा महत्त्वाचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच केंद्र सरकार बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणणार आहे. इतकेच नाही तर अनेक राज्यांमध्ये हा स्कॉट जारी केला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

Animal Husbandry | गायी आणि म्हैशींचे दूध वाढवण्यासाठी करा ‘हे’ नैसर्गिक उपाय! होईल फायदा

निर्यात शुल्क केला लागू

कांद्याच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं 28 ऑक्टोबर रोजी कमीत कमी निर्यात शुल्क (MEP) 800 डॉलर निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामुळे सर्वोच्च किंमतीतून 5 ते 9 टक्क्यांनी घट झाल्याचं सरकारचं मत असून राज्यात कांद्याच्या घाऊक भावात 4.5 टक्क्यांनी घट झाली आहे.

Lemongrass tea | खर्च कमी पण उत्पन्न जास्त! लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे ‘हे’ पीक घेऊन बघाच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *