Ahmdnagar News

Ahmednagar News । अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दिड एकर ऊस आगीत खाक! शेतकऱ्याला अश्रू अनावर

बातम्या

Ahmednagar News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी एका शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अशोक दौलत बोठे असं या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याच्या सुमारे दीड एकर ऊसाला आग लागली आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Animal Diet | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दुभत्या जनावरांसाठी आयव्हीआरआयने बनविले विशेष खाद्य; दुधात होणार दुपटीने वाढ

याबाबत अधिकची माहिती अशी की, राहता या ठिकाणी 15 चारी परिसरातील सर्वे नंबर 956 मधील अशोक दौलत बोठे यांचा दीड एकर ऊस असून शनिवारी दुपारच्या सुमारास विद्युत वाहक तारांमुळे या उसाला आग लागली आणि या आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असून यामध्ये ऊस संपूर्ण जळून खाक झाला आहे.

Success Story । वा रे पठ्ठ्या! डोंगराळ भागात शेती करून कमावले लाखो रुपये! ‘या’ शेतकऱ्याची कमाल एकदा वाचाच

ऊसाला आग लागल्याची माहिती मिळताच शेतकरी अशोक बोठे यांनी याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल सदाफळ व राहता नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला कळवली. त्यानंतर अग्निशमन दल तातडी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यानंतर अग्निशमन पथकातील लोकांच्या आणि तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि आग आटोक्यात आणली. त्यामुळे उर्वरित परिसरातील संपूर्ण चार पाच एकर ऊस आगीपासून वाचला आहे.

Voter ID | आता घरच्याघरी ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र बनवा! जाणून घ्या प्रक्रिया

राहता परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या तारा झोळ पडलेल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा स्पार्किंग होऊन ऊसाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांची पिके जळून खाक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Shabari Gharkul Yojana | सामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार! शबरी घरकुल योजनेचा नवीन जीआर निर्गमित; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *