Havaman Andaj

Havaman Andaj । पावसाबाबत मोठी बातमी! कोकणासह ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या माहिती

हवामान

Havaman Andaj । ऑक्टोबर महिन्यामध्ये उन्हाचा चटका वाढल्यानंतर राज्यात आता पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कोकणामध्ये पाऊस होण्याची शक्यता हावामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Fertilizers Information । शेतकऱ्यांनो, तुम्ही पिकाला देता ते खत खरे की खोटे? घरी बसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा; वाचा सविस्तर माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित राज्यांमध्ये कोरड्या हवामानसह, तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Mustard cultivation । मोहरीच्या लागवडीमध्ये ‘या’ खतांचा वापर कराल तर मिळेल भरघोस उत्पन्न; कृषी तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

दरम्यान, ईशान्य मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी नैऋत्य मान्सूनने निरोप घेतला होता. दुसरीकडे, दक्षिण-पश्चिम मान्सूनने प्रस्थान केले आहे आणि येथे, ईशान्य मान्सून काही दिवसांच्या विलंबाने दाखल होत आहे. या मान्सूनच्या आगमनामुळे संपूर्ण देशात कोणतेही मोठे बदल दिसणार नसले तरी दक्षिणेकडील राज्यांना मात्र याचा फटका नक्कीच बसणार आहे.

Maharashtra Cabinet Decisions । अहमदनगरमध्ये होणार नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय

तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये आजपासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून मान्सूनची सक्रियता सुरू झाली आहे. या राज्यांमध्ये पावसाची नोंद होत आहे. मात्र, त्याचा परिणाम उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या दिसणार नाही. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हवामान कोरडे राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *