Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहराची हवामान स्थिती

हवामान

Havaman Andaj । उत्तर भारतात गुलाबी थंडीने दार ठोठावले आहे. त्याचवेळी, गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू असून, त्याचा परिणाम देशातील बहुतांश राज्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, 22 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत अनेक भागात तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

uccess Story । नादच खुळा! शेतकऱ्याने वाळवंटात फुलवली पेरूची फळबाग; जाणून घ्या कस केलं नियोजन?

याशिवाय, IMD ने येत्या २४ तासांत नैऋत्य अरबी समुद्र आणि पश्चिम-वायव्य भागात वादळाचा इशारा जारी केला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. किनारपट्टीवरील कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, पश्चिम राजस्थान आणि अंदमान निकोबार बेटांवर पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Havaman Andaj)

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! येत्या गुरुवारी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

पुढील 24 तासांत या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

स्कायमेट हवामानानुसार, पुढील 24 तासांत कोस्टल कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, पश्चिम राजस्थान आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळच्या बहुतांश भागात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत पंजाब, हरियाणा, पश्चिम हिमालय आणि इतर अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस सुरू राहण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.

Sugarcane crushing season । आनंदाची बातमी! 1 नोव्हेंबरला पेटणार साखर कारखान्याचे धुराडं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *