Sugar Factory

Sugar Factory । 1 नोव्हेंबरला पेटणार का कारखान्याचं धुराडं? मंगळवारी बैठकीत होणार निर्णय

बातम्या

Sugar Factory । राज्यातील गाळप हंगामाला (Sugar Season) अजूनही सुरुवात झाली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर्षी राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे पावसाअभावी राज्यातील ऊस उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत या हंगामात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Havaman Andaj । नागरिकांना सोसावा लागणार उन्हाचा चटका! मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु

येत्या मंगळवारी ऊस गाळप हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहतील. दरम्यान, यावर्षी राज्यात एकूण १ हजार २२ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. इथेनॉलकरिता वळविण्यात येणाऱ्या साखरेशिवाय ८८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Black pepper । करा ‘या’ गुणकारी काळ्या मिरीची शेती, एका झाडापासून मिळेल हजारोंचे उत्पन्न

मागील वर्षी उत्पादन १०५ लाख टन झाले होते. १ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्रात गाळप हंगाम सुरू करावा, अशी मागणी कारखानदारांकडून केली जात आहे. यावर्षी १४ लाख ७ हजार हेक्टरवर ऊस लागवड केली आहे. त्यातून १ हजार २२ लाख टन ऊस उत्पादन होऊ शकतो. त्यापैकी ९० टक्के ऊस गाळपास आला तर एकूण ९२१ लाख टन ऊस प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध होईल.

Success story । सरलाताईंच्या जिद्दीला सलाम! कर्ज काढून फुलविली ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती, मिळवले १५ लाखांचं उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *