Government Schemes

Government Schemes । सरकार देतंय वराहपालनासाठी अनुदान, आजच करा ‘या’ सोप्या पद्धतीने अर्ज

शासकीय योजना

Government Schemes । सरकार आता व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यामध्ये व्यवसायासाठी अनुदान तसेच कमी व्याजदरात कर्ज योजना सुरु केल्या आहेत. ज्याचा लाभ घेऊन आज अनेकांनी आपले व्यवसाय (Business) सुरु केले आहे. देशभरातील लाखो लोक सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. सरकारने अशीच एक योजना सुरु केली आहे. ज्याच्या मार्फत तुम्हाला आता १५ लाख रुपये ते ३० लाख रुपये अनुदान मिळेल. काय आहे सरकारची योजना जाणून घ्या.

Success story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! २५ टन पेरूतून घेतले तीस लाखांचे उत्पन्न

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना २०२१-२२ पासून केली आहे. पशुची उत्पादकता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे, उद्योजकता विकास आणि प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी कुक्कुट, पशुखाद्य आणि वैरण उद्योजकता विकास, शेळी मेंढी आणि वराह पालनातुन (Cattle Breeding Subsidy) प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास अर्ज (Cattle Breeding Subsidy Application) करु शकतात.

Havaman Andaj । येत्या दोन दिवसात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार परतीचा पाऊस, जाणून घ्या IMD अलर्ट

किती मिळेल अनुदान?

अनुदान – १५ लाख रुपये ते ३० लाख रुपये अनुदान मिळेल.
युनिट – ५० मादी + ५ नर ते १०० मादी + १० नर.

Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी

अटी

  • अर्जदाराचे खाते असणाऱ्या शेड्युल्ड बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र गरजेचे आहे.
  • अर्जदार स्वत: किंवा त्यांच्याकडील तज्ञ हे प्रकल्पाशी निगडित प्रशिक्षित अनुभव असावा.
  • स्वतःची किंवा भाडेतत्वावरची जमीन आवश्यक

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

आवश्यक कागदपत्र

  • जात प्रमाणपत्र
  • सविस्तर प्रकल्प प्रस्ताव
  • अनुभव प्रमाणपत्र
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • जमिनिशी सबंधित कागदपत्र (स्वतःची किंवा भाडेकरार) ७/१२
  • स्वतःचे भांडवल/बँक किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज बाबत पुरावा
  • प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र
  • पॅनकार्ड
  • मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • वास्तव्य पुरावा
  • आधार कार्ड
  • अर्जदाराचा फोटो
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • कॅन्सल बँक चेक
  • भागीदारी करार
  • वस्तु व सेवाकर नोंदणी प्रमणपत्र (लागु असेल तर)
  • कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (FPO, FCO, Sec.8 कंपनीकरीता)
  • मागील ३ वर्षाचा आयकर विवरणपत्र (लागु असेल तर)
  • मागील ३ वर्षाचा ऑडीट रिपोर्ट (लागु असेल तर)

Matru Vandana Yojana 2 । दुसरे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मिळणार पैसे, काय आहे योजना? जाणून घ्या

योजेनची वैशिष्ट्ये

  • nlm.udyamimitra.in या पोर्टलवर तुम्हाला केंद्रशासन पत्र दि. ९.८.२०२१ तसेच दि. २८.१२.२०२२ अन्वये प्राप्त NUM सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार अर्ज सादर करावा लागणार आहे.
  • राज्य अंमलबजावणी यंत्रणा सदर अर्जाची छाननी करून पात्र अर्जास Online मंजुरी देऊन अर्ज बँकेकडे मंजुरीस्तव सादर होऊ शकतो.
  • बँकेने कर्जपुरवठ्याची हमी दिली की त्यानंतर सदर प्रकल्प राज्यस्तरीय कार्यकारी समितीसमोर (SLEC) मंजुरीस्तव सादर करण्यात येई
  • प्रकल्पांना SLEC द्वारे मंजुरीस्तव शिफारस प्राप्त झाल्यास, SIA (State Implementing Agency) सदर प्रस्तावाचे शिफारस पत्र online portal वर upload करून प्रकल्प केंद्र शासनास मंजुरीस्तव सादर होऊ शकतो.
  • केंद्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाची प्रकल्प मंजुरी समिती राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रकल्पांना मंजुरी मिळेल. मंजुर प्रकल्पांसाठी अनुदानाची रक्कम भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) द्वारे कर्ज मंजुरी देणारी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे देण्यात येईल.

Agriculture News । शेतकऱ्यांना देखील भरावा लागतो आयकर, काय सांगतो कायदा? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *