Modern agriculture

Modern agriculture । इस्रायल शेती तंत्र जगभरात का लोकप्रिय आहे? कशी करतात येथे शेती? जाणून घ्या…

बातम्या

Modern agriculture । हल्ली नोकरी सोडून शेती करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित लोक आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. शेतीत वेगवेगळे पिकांचे उत्पादन घेतले जाते. या पिकांनाही बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. खरंतर बऱ्याचवेळा पारंपरिक पिकांना योग्य तो हमीभाव मिळत नाही. संपूर्ण जगभरात इस्रायल शेती (Israel Agriculture) तंत्र प्रसिद्ध आहे.

Sweet Potato Varieties । ‘या’ आहेत रताळ्याच्या सुधारित जाती, लागवड केल्यास मिळेल प्रचंड नफा

जर इस्रायल आणि भारत या दोन देशांची तुलना करायची झाली तर भौगोलिक आकारापासून कमालीची भिन्नता आढळते. जेमतेम 80 लाख लोकसंख्या असणारा हा देश मुंबईपेक्षा लहान आहे. महत्त्वाचे म्हणजे हा देश काही उत्पादने युरोपात निर्यात करण्यात पहिल्या स्थानावर आहे. कृषी क्षेत्रात अत्युच्च तंत्रज्ञान (Israel Farming Techniques) शास्त्रज्ञांनी तयार केले असून त्याला जगात ख्याती आहे.

Crop insurance । पीक विमा रक्कम मिळवायची असेल तर ७२ तासात करा अर्ज, जाणून घ्या अर्जपद्धत

या ठिकाणी उभ्या शेतीच्या तंत्राचा वापर करून घराच्या भिंतीचे छोट्या शेतात रूपांतर केले जाते. अनेकजण आपल्या घराच्या भिंती सजवण्यासाठी याचा वापर करतात तर काही जण त्यांच्या आवडीच्या भाज्या वाढवण्यासाठी वापरतात. गहू, तांदूळ यासारख्या धान्यांशिवाय अनेक प्रकारच्या भाज्या मोठ्या भिंतींवर पिकवल्या जातात.

Success story । पारंपरिक शेतीला फाटा देत सांगलीच्या शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन! मिळाला 38 हजाराचा दर

इस्रायली कृषी तंत्रज्ञान

येथील कृषी तंत्रज्ञानात उभ्या शेतीतील सर्वाधिक लोकप्रिय तंत्रे हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स आणि एरोपोनिक्स ही आहेत. त्यापैकी हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये मातीचा वापर केला जात नाही. द्रावणामध्ये झाडे उगवली जातात. एरोपोनिक्स तंत्रामध्ये वनस्पती हवेत वाढल्या जातात. एरोपोनिक्स तंत्राचा खूप कमी वापर केला जात आहे. हायड्रोपोनिक्स किंवा एक्वापोनिक्स तंत्रामध्ये लोकांची आवड खूप वाढत आहे.

Udid Rate । उडदाला आज किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

इस्रायलमधील शेतीमध्ये यशामागची कारणे

  • सेंद्रिय खत बियाणे यांचा वापर
  • मार्केटिंग
  • सुधारित वाणांचा वापर, सिंचन पद्धती
  • पॅकेजिंग
  • माती, पिकांच्या कमतरता आणि गरजा शोधून पूर्ण करणे

Onion Rate । सोलापूर, बारामती बाजारसमिती कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *