Animal husbandry

Animal husbandry । कौतुकास्पद! ‘या’ गावातील सर्व महिला पाळतात गाई, महिन्याला कमावताहेत हजारो रुपये

पशुसंवर्धन

Animal husbandry । शेती करत पशुपालन केले तर त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतात. महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायात तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केले तर त्यात लाखो रुपयांचा फायदा होतो. विशेष म्हणजे गावातील सर्व महिला गायी पाळून हजारो रुपये कमावत आहेत. इतर गावातील महिला त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. (Animal husbandry information)

Soil testing । भारीच की! पोस्टाने परीक्षणासाठी पाठवता येणार माती, आठवड्यात मिळेल अहवाल

संपूर्ण गावाचा उत्पन्नाचा स्रोत

सबलपूर गावातील रहिवासी असणाऱ्या महिला जनावरांचे शेड बांधून पशुपालन करत आहेत. विशेष म्हणजे चारा देणे आणि दूध काढणे, दूध समितीपर्यंत पोहोचवणे ही सर्व कामे त्या स्वतः करतात. सुरुवातीच्या काळात एका महिलेच्या गायी पाळण्यापासून सुरू झालेला प्रवास आता संपूर्ण गावासाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनलेला आहे. त्यांच्याकडून आजूबाजूच्या गावातील महिलांना प्रेरणा मिळत आहे.

Lemon Market । शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण! लिंबांचे वाढले भाव, क्‍विंटलला मिळतोय ‘इतका’ दर

महिलाच करतात सगळी कामे

यापैकी गायी पाळणाऱ्या प्रियांका कुमारी यांनी सांगितले की, गावातील सर्व महिला गायी पाळत असून सर्व गायींचे दूध काढून त्यांची विक्री करतात. यंत्राच्या मदतीने गाईचे दूध काढले जाते. समजा वीज नसेल तर हाताने दूध काढले जाते. समितीमध्ये दूध दिल्यानंतर समितीचे सचिव दूध गोळा करून ते गया येथे घेऊन जातात. त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळत आहे.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! तीन एकर जमिनीवर केली नारळ शेती, मजुरांचीही लागत नाही गरज; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

प्रियंका कुमारी यांनी पुढे असेही सांगितले की, गायी पाळण्यापूर्वी गावातील महिला घरातील कामे करत होत्या. परंतु, आता या महिला गाई पाळून चांगला नफा मिळवत आहे. पूर्वी प्रियांकाकडे तीन गायी होत्या, त्यातून त्यांना ३५ हजार रुपये मिळाले. आता त्यांच्याकडे चार गायी आहेत, त्यातून त्यांना 40 ते 45 हजार रुपये मिळत आहेत. त्यापैकी 15 हजार रुपये गाईच्या चाऱ्यासाठी खर्च होतात तर उरलेले पैसे त्यांच्याकडे बाकी राहतात.

Animal Care । ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा जनावरांच्या आजारापासून मुक्तता, जाणून घ्या सविस्तर

सेंद्रिय खतांतूनही होतोय फायदा

तसेच त्याच गावातील बेबी देवी यांनी असे सांगितले की, त्या गायी पाळत आहेत. त्यांनी सांगितले पशुपालनामध्ये त्यांना खूप फायदा होतो. शेणापासून सेंद्रिय खत तयार केले जात असून हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्या शेतीची कामे करत होत्या. नंतर त्यांनी गाय पाळायला सुरुवात केली, त्यामुळे त्यांना खूप नफा झाला.

Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *