Agriculture News

Agriculture News । पीक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करायचाय? तर मग ही बातमी वाचाच

कृषी सल्ला

Agriculture News । अलीकडच्या काळात काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांना यात चांगला नफा मिळत आहे. शेतीमध्ये खुप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. तरच त्याचे चांगले फळ हाती येते. शेतीमध्ये आता नवनवीन उपकरणे येऊ लागली आहेत. ज्यामुळे शेतीची कामे झटपट आणि कमी खर्चात होऊ लागली आहेत. अनेक शेतकरी पीक फवारणीसाठी ड्रोनचा (Drone) वापर करतात.

Success Story । शेतकऱ्याची कमाल! अवघ्या दीड महिन्यात 40 गुंठे कोथिंबिरीतून घेतले तीन लाखांचे उत्पन्न

यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर वाचत (Spray with Drone) आहे. पिकांवर कोणत्याही प्रकारचे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी फवारणी करावी लागते. अनेकजण आजही फवारणीसाठी स्वयंचलित किंवा ट्रॅक्टर वर बसवलेल्या फवारणी यंत्राचा वापर करतात, परंतु यामुळे कीटकनाशक वाया जाते. जर तुम्ही ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. (Drone Uses)

PM Kisan Yojana । धक्कादायक! ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमा होतेय पीएम किसानची रक्कम

किती येईल खर्च?

ड्रोन फवारणीच्या खर्चाचा विचार करायचा झाला तर पाच लिटर क्षमतेच्या ड्रोन फवारणीसाठी पाच लाख रुपये, दहा लिटर क्षमतेच्या ड्रोन फवारणीसाठी सात लाख रुपये इतका खर्च येतो. जर फवारणीचा खर्च प्रति एकर पाहिला तर तो जर तुम्ही मॅन्युअल फवारणी करत असल्यास 400 ते 500 रुपये, एचटीपी स्प्रेयर 450 रुपये, बुम स्प्रेयर साडेतीनशे ते चारशे रुपये, ब्लोअर साडेचारशे ते पाचशे रुपये आणि ड्रोन 407 रुपये प्रति एकर खर्च तुम्हाला येईल.

Success story । शेतकऱ्याचा नादच खुळा! दुष्काळावर मात करत गुगल, युट्युबच्या मदतीने फुलविली ड्रॅगन फ्रुटची शेती

परवडणारी पद्धत

जर पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने कीटकनाशक फवारणीच्या खर्चाचा विचार केला तर आधुनिक पद्धत शेतकऱ्यांना परवडते. त्यामुळे तुम्ही आता ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केली तर तुमची पैशांची बचत होईल, शिवाय तुमचा वेळही वाचेल.

Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *