PM Kisan Yojana । राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची (PM Kisan) सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजारांचा लाभ दिला जातो.
अशातच आता पीएम किसान योजनेविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) केली नसल्याने ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण ८९०० मयत शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होत आहे. एकीकडे पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी धडपड करत आहेत तर दुसरीकडे मयत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षी ५ कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा होत आहे.
Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी आणि आधार सीडिंग करणे बंधनकारक केले आहे. सूचना देऊनही अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांनि याकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आता आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान योजनेच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाईल. परंतु या आकडेवारीने सर्वांना धक्का बसला आहे.
Gift Deed । जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? ते रद्द करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
या दिवशी येणार पुढचा हप्ता
पीएम किसान या योजनेचा १५ वा हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबरदरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, त्याबाबत सजूनही सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सर्वजण या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Havaman Andaj । परतीच्या मान्सूनला सुरुवात! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार