Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी सरकार वेळोवेळी मदत करत असते. ज्याचा फायदा त्यांना होतो. अनेकांना फक्त शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यात अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. परंतु तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर अशा गाई आणि म्हशींच्या जातींचे पालन करा ज्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल.
Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
परंतु असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेता येत नाही. त्यामुळे त्यांना या व्यवसायातून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. पशुपालकांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने एक खास योजनेला सुरुवात केली आहे. या योजनेअंर्तगत पशुपालकांना 1 लाख 60 हजार रुपयांचा फायदा होईल. (MGNREGA Cattle Shed Scheme)
Onion Rate । आज कांद्याला सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
मनरेगा पशु शेड योजना
पशुसंवर्धन हे असे क्षेत्र आहे जे बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत आहे.परंतु क्षेत्रात काम सुरू करण्यासाठी पैशांची खूप गरज असते त्यामुळे अनेक तरुण आणि शेतकरी हा व्यवसाय सुरु करू शकत नाहीत. आता याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने मनरेगा पशु शेड योजनेला (Cattle Shed Scheme) सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत पशुसंवर्धनाचे काम करू इच्छित असणाऱ्या व्यक्तींना पशुशेड बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत त्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरु करता येईल. ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल.
Guar Cultivation । अशा पद्धतीने करा गवार लागवड, होईल बक्कळ कमाई
जाणून घ्या योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत, खालील जनावरांच्या आधारे फायदे मिळतात.
- तीन जनावरांसाठी: 75,000 हजार रुपये ते 80,000 हजार रुपये
- चार जनावरांसाठी : 1 लाख 60 हजार रुपये
- सहा जनावरांसाठी : 1 लाख 16 हजार रुपये
Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल
जाणून घ्या पात्रता
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे कमीत कमी 3 जनावरे असावीत.
- जर जनावरांची संख्या तीन ते सहा पेक्षा जास्त असेल तर त्यांना 1 लाख 60 हजार रुपये मिळतात.
- अर्जदाराला पंचायत प्रतिनिधीला भेटून त्याचे पंचायत प्रमुख, सरपंच आणि प्रभाग सदस्यांशी संपर्क साधावा लागेल तरच त्यांचा अर्ज स्वीकारला जाईल.
- तसेच अर्जदाराला त्यांचा अर्ज आणि आवश्यक ती कागदपत्रे त्यांच्या जिल्ह्यातील मनरेगा विभागाकडे जमा करावा लागेल.
Animal husbandry । आलिशान कारपेक्षा महाग म्हैस! किंमत जाणून व्हाल थक्क
अर्ज प्रक्रिया
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ज ऑफलाइन पद्धतीने करू शकता. अर्जदाराला पंचायत प्रतिनिधीला भेटून मंजुरी मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल.
Vegetables Price Hike । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाजीपाल्यांच्या किमतीत कमालीची वाढ