Solar pumps

Solar pumps । सावधान! ‘या’ ठिकाणी चोरटयांनी घातलाय धुमाकूळ; शेतातील सौर पंपांची रातोरात चोरी

बातम्या

Solar pumps । सध्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सौर पंपाचे पॅनल चोरी करणारी टोळी सध्या धारूर तालुक्यामध्ये सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे. या टोळीने मागच्या काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात लावलेले सौर पंप चोरले आहेत याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. (Solar pumps)

LPG Cylinder New Price । केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर

चोरट्यांनी घातला धुमाकूळ

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामधील आवरगाव या ठिकाणच्या महादेव जगताप या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसवलेल्या सौर पॅनलच्या तब्बल अडीच ते तीन लाख रुपये किमतीच्या 18 प्लेट चोरटयांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आता इतर शेतकऱ्यांमध्ये देखील सौर पंपा बद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर देखील या चोरटयांनी एक मोठे आव्हान उभा केले आहे.

Apple job । मानलं रे भाऊ तुला..! आई-वडिलांसाठी सोडली परदेशातील 72 लाखांची नोकरी, आता करतोय शेती

सरकारने योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौर पंप बसवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा खर्च बऱ्यापैकी वाचला आहे. मात्र आता चोरट्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी सोलार फ्रेंड तर काही ठिकाणी सोलर सिस्टिमचे स्टार्टर चोरी जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Black Diamond Apple । जगातलं सर्वात महागडं सफरचंद, किंमत जाणून उडतील तुमचे होश

शेतकरी दुहेरी संकटात

यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा बीड जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चांगल्याच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याचे संकट आणि आता दुसरीकडे सौर पंप चोरीला जात असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Pomegranate Price Hike । डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन! एका क्रेटला मिळतोय विक्रमी दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *