Success story

Success story । केळीच्या पिकातून चमकले नशीब! ९ महिन्यात घेतले ९० लाखांचे भरघोस उत्पादन

यशोगाथा

Success story । सध्याच्या काळात काही तरुण शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे ते पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. त्यापैकी काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता यशस्वी शेती करत आहेत.परंतु, त्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.

Subsidy For Poultry । आनंदाची बातमी! 25 लाखांचे अनुदान घेऊन करा लेयर कुक्कुटपालन, असा करा अर्ज

महाराष्ट्रातील सांगोल्यातील प्रताप लेंडवे या शेतकऱ्याने डाळिंबाचे पीक न घेता केळीचे पीक (Cultivation of Banana) घेतले आहे. त्यातून त्यांना अवघ्या एका वर्षात ८१ लाखांचे भरघोस उत्पादन घेण्यात यश आले आहे. खरंतर सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे पीक घेतले जाते. परंतु प्रताप लेंडवे यांनी दुसरे पिके घेऊन त्यात प्रचंड नफा मिळवून दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Banana cultivation)

Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी

असे केलं नियोजन

इतरांप्रमाणे प्रताप लेंडवे यांनी देखील सुरुवातीला डाळिंबाचे पीक घेतले होते. परंतु त्यांना या पिकातून म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे त्यांनी एका मित्राच्या सल्ल्याने केळीची लागवड केली. सांगोला येथील हळदहीवाडी येथे लेंडवे यांनी ६ एकरमध्ये केळीची लागवड केली आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर येथील व्यापाऱ्यांना ३५ रुपये प्रतिकिलो दराने केली विकली. त्यातून त्यांना ९० लाख रुपये मिळाले.

Havaman Andaj । सावधान! पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

दर्जेदार पीक

आनंदाची बाब म्हणजे लेंडवे यांची केळी इतकी दर्जेदार आहे की स्वतः व्यापारी त्यांच्या शेतात जाऊन केळीची खरेदी करतात. ठिबक सिंचनावर त्यांनी केळीची लागवड केलीय. ५५ ते ६० किलो इतके केळीच्या एका घडाचे वजन असते. अशाप्रकारे त्यांनी एक एकरमधून ५० टन केळीचे उत्पादन घेतले.

Rose Farming । गुलाब लागवडीचा योग्य काळ कोणता? कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? जाणून घ्या माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *