Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकाला जीवनदान मिळाले आहे तर काही ठिकाणी पाण्यामुळे शेतकऱ्यांचे शीतपिक वाया देखील गेले आहे दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासांमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण काही भागांमध्ये वाढणार आहे.
Rose Farming । गुलाब लागवडीचा योग्य काळ कोणता? कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? जाणून घ्या माहिती
यामध्ये मुंबई कोकण आणि गोवा किनारपट्टी भागामध्ये पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळेल त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळताना दिसणार आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
पुणे सातारा कोल्हापूर या भागांमध्ये देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हे सर्व चित्र दिसत असतानाच राज्याच्या बहुतांश भागांमधून पाऊस लवकरच काढता पाय घेण्याची चिन्ह नाकारता येत नाहीत.
ऑक्टोबर मध्ये कमी पाऊस होणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यापासूनच पावसाने देशाच्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून ऑक्टोबर महिन्यात पाऊस परतीचा प्रवास करणार असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र असं असलं तरी परतीच्या पावसापूर्वी राज्यात मान्सून शेवटच्या टप्प्यात जोरदार दिसणार आहे. त्याचबरोबर दहा ऑक्टोबर नंतर टप्प्याटप्प्याने परतीचा प्रवास सुरू होऊन पावसाच्या सरी अधून-मधून बसणार असल्यासची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.