Success Story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! अवघ्या 20 गुंठ्यात आल्याच्या लागवडीतून घेतले भरघोस उत्पन्न

यशोगाथा
Success Story

Success Story । नैसर्गिक तसेच मानवनिर्मित समस्यांवर मात करत शेतकऱ्यांना शेती करावी लागते. जर तुम्हाला शेतीतून जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि मनात जिद्द असावी लागते. (Farmer Success Story) हल्ली शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने आल्याच्या लागवडीतून (Ginger Cultivation) भरघोस उत्पन्न घेतले आहे.

Garlic Price । लसणाचा भाव का आहे चर्चेत? जाणून घ्या सध्या बाजारात किती भाव मिळतोय

सचिन परशुराम कदम (Sachin Parasuram Kadam) असे या शेतकऱ्याचे नाव असून ते सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथे राहतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते मागील 13 वर्षांपासून आल्याची शेती करत आहेत. मागील एका वर्षांपूर्वी त्यांनी 20 गुंठे क्षेत्रामध्ये आल्याची लागवड केली असून त्यातून त्यांना एक गुंठा क्षेत्रामध्ये सुमारे 400 ते 500 किलो उत्पन्न अपेक्षित होते.

Crop Insurance । धक्कादायक! शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित, संतप्त शेतकरी थेट चढला टॉवरवर

पण सचिन कदम यांनी एक गुंठे क्षेत्रामधून आल्याचे तब्बल 900 ते 1000 किलो उत्पादन घेऊन दाखवले आहे. त्यामुळे सचिन कदम हे चर्चेचा विषय बनत आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही किमया साधली आहे. केवळ 20 गुंठयातून त्यांनी 19 ते 20 टन आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यामुळे त्यांना आर्थिक हातभार लागला आहे.

Tamarind Rate ।  आंबट गोड चिंच खातेय भाव! प्रति क्विंटन मिळत आहे ‘इतका’ दर

असे केले नियोजन

सचिन कदम यांनी लागवड करण्यापूर्वी आल्याच्या शेतीचा संपूर्ण अभ्यास, मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, शेताला वेळेवर पाणी यांचे योग्य नियोजन केले. इतकेच नाही तर त्यांनी शेणखतांचा वापर, कारखान्याची राख, उसाच्या कारखान्याची मळीचा वापर, आठ दिवसातून कीटकनाशकांची फवारणी, आल्याला बुरशी लागू नये यासाठी फवारणी केली.

Soyabeen Rate । सोयाबीन उत्पादकांवर आर्थिक संकट! भाव नसल्याने पीक घरातच पडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *